OAK KULMANDAL

आम्ही ओक - आपले स्वागत करतो.

वासिष्ठेन्द्र प्रमदा भरद्वश्वेती                   
त्रिप्रवरांद्विता: वसिष्ठ-गोत्रोत्पन्न:        
यजुर्वेदस्य तैत्तिरीय-शाखांतर्गत   
हिरण्यकेशी शाखाध्यायीन:

श्री. योगेश्वरी देवी, अंबेजोगाई

श्री देवी योगेश्वरी म्हणजे श्री दुर्गादेवीचे अधर्मी दैत्यांचे निर्दालन करण्यासाठी घेतलेले रूपच होय.अंबेजोगाई येथे स्थित असलेल्या श्री देवी योगेश्वरी बद्दल दोन आख्यायिका आहेत.

दंतासूर नावाच्या राक्षसाचे पारिपत्य करण्यासाठी मराठवाड्यातीक भाविकांनी कोकणात येउन श्री दुर्गादेवीला साकडे घातले. दंतासुराचा वध फक्त स्त्रिच्याच हातून होईल असा त्याला वर मिळाला होता. या बलाढय राक्षसाचा वध करण्याकरता श्री दुर्गादेवी येथे प्रगट झाली व दंतासुराचा वध करून आंब्याच्या झाडाखाली विश्रांतीस बसली आणि तेव्हापासून हे ठिकाण जोगाई किंवा योगाईचे अंबे झाले.

दुसरी आख्यायिका अशी की, श्री दुर्गादेवी भोलेनाथाशी लग्न करण्यासाठी परळी वैजनाथाला निघाल असताना काही कारणामुळे तिला उशीर झाला व ती अंबेजोगाई पोहोचेपर्यंत रात्र झाली व गोरजमुहुर्ताची वेळ टळून गेल्यामुळे श्री भोलेनाथ संतापून कैलासावर निघून गेले व तिला ही वार्ता कळल्यावर ती येथे येऊन आंब्याच्या झाडाखाली स्थित झाली व त्यामुळे त्या गावास जोगाईचे अंबे कींवा अंबेजोगाई असे नाव रूढ झाले. अंबेजोगाई येथील श्री योगेश्वरीचे हे त्यामुळे कुमारीकेचे आहे.

जयंती नदिच्या काठी असलेले हे अंबेजोगाई मंदिर अतिशय पुरातन असून वास्तुशिल्पाचा अत्यंत उत्तम नमुना आहे. भर बाजारपेठेतून मंदिरात प्रवेश केल्यावरे एक भव्य दिपमाळ दिसते. ती पुर्वाभिमुख महाद्वारासमोर आहे. तसेच उत्तराभिमुख महाद्वारासमोर सुध्दा अशीच एक मोठी दिपमाळ आहे. उत्सवाच्या वेळी त्रिपुरी पौर्णिमेला दोन्ही दीपमाळावर दिव्याची आरास केली जाते.

या मंदिराचे वार्षिक उत्सव हे आश्विन शुद्ध प्रतिपदा ते दशमी (नवरात्र) व तसेच मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी ते पौर्णिमेपर्यंत असतात. या उत्सवामध्ये नऊ दिवस भजन, किर्तन, प्रवचन व गायन असे कार्यक्रम असतात. येथे मुर्तीपूजा केली जात नसून पाद्यपूजा केली जाते.

यावेळी शतचंडिपाठाचे हवन होते येथील नित्यपूजा हे प्रथेप्रमाणे गुरव करतात. तसेच ब्राह्मणाद्वारे पादुंकावर अभिषेक केला जातो. पुजा-यांशिवाय देवीला कोणीही स्पर्श करत नाहीत. सर्व साधारणपणे येथे येणा-या बहुसंख्य चित्पावन ब्राह्मण कुटुंबियांची पूजा अभिषेक, नैवेद्य, ओटी भरणे, कुंकूमार्चन विधी, सवाष्ण, ब्राह्मण, कुमारीका भोजन व प्रसाद असे धार्मिक कार्यक्रम करता येतात.

रोज देवीस पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो. अंबेजोगाई येथे भक्तनिवास असून गावामध्ये निवासाची व रहाण्या जेवणाची व्यवस्था आहे. महाप्रसादाची अथवा नैवेद्याची व्यसस्था श्री. पाठक गुरूजी, गुरूवार पेठ, मंदिर रोड यांचे कडे आहे.

या हेमांडपंथी शैलीत बांधलेल्या मंदिराचे शिखर इतर मंदिरांपेक्षा वेगळे आहे. हे शिखर पाच मजली असून पहिल्या मजल्यावर रामायण-महाभारतातील प्रसंगांची शिल्पे आहेत. दुस-या मजल्यावर श्री योगेश्वरी देवीच्या अवतारांची शिल्पे आहेत. तिस-या मजल्यावर श्री विष्णूच्या दशावताराची शिल्पे आहेत. चौथ्या मजल्यावर नवग्रह आहेत तर पाचव्या मजल्यावर सप्तर्षी आहेत.

श्री योगेश्वरीच्या द्वादश अवतारातील श्री मातृरूप योगिनी-गणेशाचे एक वेगळे शिल्प आहे. या स्त्रीरूपातील गणेशमूर्तीला अठरा हात आहेत असा मातृस्वरूप गणेश इतर कोठेही पहाण्यास मिळत नाही.

चित्पावनांची मूळ कुलदेवी दुर्गादेवी. परंतु समुद्रकाठी होणारी हबशी व चाच्यांची आक्रमणे व त्यांनी केलेला मंदिराचा विध्वंस यामुळे कोळथरे, मुरूड, गुहागर येथील दुर्गादेवीची मंदिरे अनेक वेळा भग्न झाली. त्यामुळे त्या काळात स्थलांतरीत झालेल्या अनेक चित्पावन घराण्यांनी श्री योगेश्वरी हे दुर्गादेवीचे रुप असल्याने तिला आपली कुलदेवी मानली.

सौजन्य - कुलदैवत : अजित पटवर्धन