OAK KULMANDAL

आम्ही ओक - आपले स्वागत करतो.

वासिष्ठेन्द्र प्रमदा भरद्वश्वेती                   
त्रिप्रवरांद्विता: वसिष्ठ-गोत्रोत्पन्न:        
यजुर्वेदस्य तैत्तिरीय-शाखांतर्गत   
हिरण्यकेशी शाखाध्यायीन:

तिसरे ओक कुलसम्मेलन्

दिनांक - १२ जाने. २०१०

ओकांचे तिसरे कुल संमेलन गुहागर तालुक्यातील हेदवी या निसर्गरम्य गावामध्ये श्री दशभुज लक्ष्मी गणेशमंदिर परिसरात धार्मिक, सांस्कृतिक तसेच विविध विषयांवर चर्चासत्र व मार्गदर्शन घेत मोठया उत्साहात पार पडले. या दोन दिवसीय ओक संमेलनात लक्ष्मी नारायण हेदवी प्रासादिक भजन मंडळाचे भजन, बुवा निखिल ओक यांचे गायन, चिपळूण येथील मंदार ओक यांचा कविता एक प्रवास हा कार्यक्रम, त्यानंतर प्रसिध्द हार्मोनियम वादक विद्याधर ओक यांचा हार्मोनियमची ओळख व त्यांनी वाजविलेल्या विविध रागातील गाण्यांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले.

दुसऱ्या दिवशी खुल्या अधिवेशनाला सुरुवात झाली. दत्तात्रय ओक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या अधिवेशनात ओक कुलप्रमुख रघुवीर ओक, विनायक ओक गुरूजी आदींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन आनंद ओक यांनी केले. या संमेलनाला मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, गुजरात, कोल्हापूर, सांगली, गोवा, रायगड, पेण येथील ओक बंधु-भगिनींनी उपस्थिती लावली होती.