वासिष्ठेन्द्र प्रमदा भरद्वश्वेती
त्रिप्रवरांद्विता: वसिष्ठ-गोत्रोत्पन्न:
यजुर्वेदस्य तैत्तिरीय-शाखांतर्गत
हिरण्यकेशी शाखाध्यायीन:
दिनांक २६ डिसेंबर २०१०. स्थळ - कऱ्हाडे ब्राह्मण सेवा मंडळ, समाज मंदिर हॉल, डोंबिवली
ओकांच्या चौथ्या ओक कुल संमेलनास डोंबिवली येथे पार पडले. या संमेलनाचे अध्यक्षपद सुहास ओक यांनी भूषविले. या संमेलनास श्री. सुधीर जोगळेकर, डॉ. संजय ओक, विद्याधर ओक, जयंत ओक,चंद्रशेखर ओक आणि कुलप्रमुख रघुवीर ओक यांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमात श्री. सुधीर जोगळेकर यांनी सर्व चित्पावन कुलांकडून कुलसंमेलन भरविण्यास जोर देण्याबरोबर कुलाचा विकास एकत्र येउन कसा करावा याबद्दल मार्गदर्शन केले. चंद्रशेखर ओक यांनी ओक कुलाच्या विकासासाठी काय करता येईल यावर विचार मांडले आणि आपल्या कार्यासंदार्भातील अनुभव विषद केले.
आजच्या दिवशीच www.oakkulmandal.org या संकेतस्थळाचे उदघाटन करण्यात आले.
त्यानंतर श्री. जयंत ओक यांनी आपल्या बहारदार गप्पा गोष्टी या कार्याक्रमाद्वारे उपस्थितांचे मनोरंजन केले. श्री. विद्याधर ओक यांनी आपल्या संवेदिनीवर यमन रागावरील काही गाण्यांची झलक वाजवून दाखवत या कार्यक्रमावर कळस चढवला.
या कार्यक्रमानंतर के.ई.एम. चे अधिष्ठाता डॉ. संजय ओक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर उपस्थितांशी एका छोटेखानी मुलाखतीद्वारे संपर्कही साधला.
भोजनानंतरच्या सत्रात श्री. मनोज ओक यांनी ओक कुलाच्या ट्रस्ट स्थापण्याची संकल्पना मांडली आणि सर्वानुमते ट्रस्ट ची स्थापन येत्या आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत करण्याचे ठरवले.
या संमेलनाला डोंबिवलीसह बदलापूर, मुंबई, पुणे, नाशिक, गुहागर, पालशेत, रायगड, पेण इत्यादी येथील सुमारे दोनशेहून आधिक ओक बंधु-भगिनींनी उपस्थिती लावली होती.पुढील कुलसंमेलन नाशिक येथे आयोजित करण्याचे ठरले आहे.