OAK KULMANDAL

आम्ही ओक - आपले स्वागत करतो.

वासिष्ठेन्द्र प्रमदा भरद्वश्वेती                   
त्रिप्रवरांद्विता: वसिष्ठ-गोत्रोत्पन्न:        
यजुर्वेदस्य तैत्तिरीय-शाखांतर्गत   
हिरण्यकेशी शाखाध्यायीन:

गोकुळ अष्टमी

भगवान श्रीकृष्णानी धर्माचे रक्षण करण्यासाठी ज्या दिवशी अवतार घेतला तो दिवस म्हणजे जन्माष्टमी किंवा गोकुळअष्टमी./p>

गोकुळअष्टमीचा उत्सव पूर्वी घरोघरी केला जात असे. स्वच्छ काळी माती आणून चाळून घेऊन पाण्यात भिजवायची व त्यापासून सर्व मातीचे गोकुळ केले जायचे. पाटावर तटरक्षक, पाळणा, श्रीकृष्ण बलरामाच्या मूर्ती हे सर्व मातीचे करून पाटावर रांगोळी काढली जायची. त्याच्या समोर गोकुळातील सर्व संसार ठेवला जायचा व रात्री जन्मसोहळा करायचे. दुसरे दिवशी पाळण्यातून बलराम व कृष्ण काढून धान्यात ठेवले जात व आदल्या वर्षी धान्यात ठेवलेले बलराम, कृष्ण हे इतर पाटावरील गोकुळासमवेत बोळवले जात.

हल्ली जागेचा व वेळेचा अभाव यामुळे हा सोहळा सांघिकरीत्या, सार्वजनिक ठिकाणी सभागृहात किंवा श्रीकृष्णाचे मंदिरात साजरा केला जातो.

गोकुळअष्टमीच्या दिवशी उपवास करतात व दुसरे दिवशी पुरणावरणाचा स्वंयपाक करुन नैवेद्य दाखवला जातो व पारणे केले जाते.

गोकुळअष्टमीचा उत्सव हा श्रावण वद्य प्रतिपदेपासून अष्टमीपर्यंत केला जातो. या उत्सवात आठ दिवस अखंड वीणा घेतात. पहिले दिवशी हातात घेतलेला वीणा जन्मसोहळ्याच्या दुसरे दिवशी पारण्याला खाली ठेवला जातो. पारण्याच्य दिवशी देवाला व वीणेला नैवेद्य दाखवून मग वीणा खाली ठेवतात. सुरुवातीला त्याची हळदकुंकू लावून पूजा केली जाते मग वीणा हातात घेतात.

सौजन्य - कुलदैवत : अजित पटवर्धन