OAK KULMANDAL

आम्ही ओक - आपले स्वागत करतो.

वासिष्ठेन्द्र प्रमदा भरद्वश्वेती                   
त्रिप्रवरांद्विता: वसिष्ठ-गोत्रोत्पन्न:        
यजुर्वेदस्य तैत्तिरीय-शाखांतर्गत   
हिरण्यकेशी शाखाध्यायीन:

नोंदणी

सर्वप्रथम ओक कुलवृतांतांच्या नोंदणी प्रक्रियेत आपण दाखविलेल्या रसाबद्द्ल धन्यवाद.

आपणास माहित असेलच कि ओक घराण्याचा इतिहास (१९७६) व ओक कुल व्यक्ति परिचय (१९७९) हे दोन ग्रंथ यापुर्वी प्रकाशित झाले आहेत. हि माहिती गोळा करण्याचा उद्देश सर्व ओक कुटुंबियांची माहीती गोळा करून सुधारीत कुलवृतांत तयार करणे हा आहे.

आम्हांस काय माहिती अपेक्षित आहे?

      १. आपले संपूर्ण नाव आपल्या आजोबा व पणजोबांच्या नावासह. आपण पुरवलेले आजोबा व पणजोबांच्या नावाचा वापर अचुकपणे नाते शोधण्यासाठि होईल.
      २. आपली जन्मतारीख (आम्ही हयात व्यक्तिचे जन्मसाल संकेतस्थळावर दाखवत नाही त्यामुळे काळजी नसावी.)
      ३. आपला रक्तगट - ह्या माहितीआधारे आपल्या कुटुंबामध्येच रक्ताची गरज भासल्यास उपयोग होवू शकेल.
      ४. जोडिदाराचे नाव (विवाहीत व्यक्तिंकरता) - विवाहित माहेरवाशीणीच्या सासरचे व सासुरवाशिणींच्या माहेरचे संपूर्ण नाव येथे अपेक्षित आहे.
      ५. शिक्षण/व्यवसाय इतर माहिती - सध्यातरी हि माहिती गोळा करण्यामागे विशिष्ट हेतू नाही, परंतु भविष्यात ओक कल्याणासाठी वापर होऊ शकेल असे वाटते.

आपण दिलेली माहिती आम्ही कोठल्याही त्रयस्थास कुठल्याही कारणास्तव दिली जाणार नाही.

माहिती गोळा करण्या संदर्भात वा संकेतस्थळाबद्दल आपणास काही प्रश्न अथवा मत प्रदर्शित करायचे असल्यास आपण मला इमेल करा खालील पत्त्यावर - girishoak@gmail.com

आपल्या सोयीसाठी हा तपशील इंग्रजी मध्येच भरायचा आहे.

Proceed