वासिष्ठेन्द्र प्रमदा भरद्वश्वेती
त्रिप्रवरांद्विता: वसिष्ठ-गोत्रोत्पन्न:
यजुर्वेदस्य तैत्तिरीय-शाखांतर्गत
हिरण्यकेशी शाखाध्यायीन:
गुढी पाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे. या दिवशी नवीन संवत्सराचा प्रारंभ होतो. शालिवाहन शकाची सुरूवात याच दिवशी झाली. पूर्वी घराच्या अंगणातील जमीन शेणाने सारवून रांगोळी घालून तेथे गुढी उभी केली जायची.
श्री रामचंद्रानी रावणाचा वध करून लंका जिंकली व ते ज्या दिवशी अयोध्येला परत आले तो दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदा होता.अयोध्यानगरीतील लोकांनी घरोघरी गुढया तोरणे उभारून आनंद व्यक्त केला होता.
गुढी उभारण्यापूर्वी गुढीला (काठीला) तेल लावून गरम पाण्याने धुवून घ्यावी. गुढी उभी करताना धातूचे भांडे (पितळी, चांदी, तांबे), कडुलिंबाचा डहाळा, जरीचा खण अथवा कापड, साखरेच्या गाठींची माळ लावावी. जेवणामध्ये मुख्यत्वेकरून खीर किंवा पुरणावरणाचा स्वयंपाक केला जातो. कडुलिंबाच्या पानाची कडू चटणीही या दिवशी आवर्जून केली जाते.
जेवणास सुरूवात करण्याआधी ही चटणी खावी व मग जेवावे. ही चटणी आरोग्यास चांगली असते. तसेच कडू सगळे पचवून नवीन वर्षारंभ गोड करावा अशी विचारसारणी त्याच्या मुळाशी असावी.
सौजन्य - कुलदैवत : अजित पटवर्धन