वासिष्ठेन्द्र प्रमदा भरद्वश्वेती
त्रिप्रवरांद्विता: वसिष्ठ-गोत्रोत्पन्न:
यजुर्वेदस्य तैत्तिरीय-शाखांतर्गत
हिरण्यकेशी शाखाध्यायीन:
पावसाळा संपत आल्यावर समुद्रामध्ये नावा, बोट प्रथम घालणेचा हा दिवस. जलदेवतेचा कोप होऊ नये, समुद्र शांत रहावा म्हणूण लोक जलदेवतेची पूजा करून समुद्राला नारळ व नाणी अर्पण करतात.
हाच दिवस रक्षाबंधनाचा. स्वतःच्या अगर मानलेल्या भावाला बहीण राखी बांधते. भावाने बहिणीचे रक्षण करावे हा त्यामागे हेतू आहे.
तसेच नारळी पौर्णिमा किंवा श्रावणी पौर्णिमा हा दिवस श्रावणी करण्याचा. या दिवशी नवीन यज्ञोपवित धारण केले जाते. या दिवसाचे मुख्य पक्वान्न म्हणून नारळी भात. बाकीचे पदार्थ इतर सणाप्रमाणे करतात.
सौजन्य - कुलदैवत : अजित पटवर्धन