OAK KULMANDAL

आम्ही ओक - आपले स्वागत करतो.

वासिष्ठेन्द्र प्रमदा भरद्वश्वेती                   
त्रिप्रवरांद्विता: वसिष्ठ-गोत्रोत्पन्न:        
यजुर्वेदस्य तैत्तिरीय-शाखांतर्गत   
हिरण्यकेशी शाखाध्यायीन:

विंग कमांडर शाशिकांत ओक

नाव - शशिकांत जनार्दन ओक. वय 64 चालू.

लहानपण सांगली-माधवनगर भागात गेले.वडिलांचा घाऊक धोतराच्या कापडाचा व्यापार होता. आईने किर्तनकार-प्रवचनकार म्हणून नाव मिळवले. इतिहासतज्ञ स्व. पु. ना. ओक चुलत काका.

रँक - विंग कमांडर

नोकरी - १९७१ ते २००३ या ३२ वर्षांच्या कार्यकाळात श्रीनगर (काश्मीरला ३ वेळा ) तर चंदीगढ़. कानपूर, नवी दिल्ली, लुधियाना, चेन्नई, कोईमतूर, ठाणे व पुणे अशा बदल्यातून देशभर संचार झाला.

पुण्यात महाराष्ट्र राज्य माजी सैनिक महामंडळात कार्यरत होते. तेथे राज्यातील ५००० माजी जवानांना त्यांच्या घराजवळ नोकऱ्यातून रोजगार उपलब्ध करून दिला जातो.

हवाईदलात कामाचे स्वरूप चार्टर्ड अकाऊंटंट, व बँक मॅनेजर कम फायनानशियल कंट्रोलर असे होते.

छंद क्र. १ - नाटकात कामांची हौस. नवी दिल्लीच्या बृहनमहाराष्ट्र नाट्य स्पर्धेत सहभाग, अनेक ठिकाणी अनेक नाटके बसवली. विविध नाट्यदर्शन नावाचा तीन तासाचा कार्यक्रम वैशिष्ठ्यपूर्ण होता.
छंद २ - गुरुचरित्राच्या पारायणाचा प्रसाद म्हणून \\\\\\\"अपछायिता\\\\\\\" नावाची कादंबरीचे लेखन झाले. सन २००७च्या २६ जानेवारीला सोनी टीव्हीवरून ‘मन में है विश्वास’ या धारावाहिकेत हवाईदलातील जीवनात घडलेल्या सत्यघटनेवर आधारित गुरुचरित्राच्या महतीते कथन करणारा एक एपिसोड दर्शवला गेला.
छंद ३ - कोडी बनवायचा नाद. त्यातून मराठी व हिंदीतून अनेक विषयांवर कोडी बनवून अनेक नियतकालिकांतून प्रकाशित. सध्या फुल्ल मनोरंजन मधे चालू. दोन पुस्तके हिंदीत प्रसिद्ध.
छंद ४ - गेले 18 -19 वर्ष नाडी भविष्यावर शोध अभ्यास चालू. प्राचीन महर्षींनी लिहून ठेवलेले ज्ञान भांडार आम्हा भारतीयांना ज्ञात करून त्याचा लाभ लोकांनी घ्यावा यासाठी अविरत धडपड.
छंद ५ -ऑटो रायटिंग मधून परामानस विद्येतून मृतात्म्यांशी संवाद-संपर्क. त्यांच्याद्वारे मिळावलेले संदेश लिहिण्याचे कार्य व इतरांना मार्गदर्शन.

याशिवाय नाडी भविष्यावर एकदिवशीय अधिवेशन २००७ला पुण्यात,२००९ ला बडोद्यात तर २०१० साली युरोपात प्रागला घेतले. पुण्यात चेन्नईच्या इंडॉलॉजीत तमिळताडपत्रांवर काम करणाऱ्यासंस्थेचे संचालक अध्यक्ष होते. त्यांनी नाडीवर आधारित सँपल डिक्शनरी बनवून आणली होती.वेबसाईट तयार केली.

BOOKS -
NAADI PREDICTIONS A MIND BOGGLING MIRACLE. RS 250/-
हिन्दी - नाडी ग्रंथ भविष्य - चौंका देनेवाला चमत्कार रु.175-
मराठी - नाडी ग्रंथ भविष्य - चला नवग्रह यात्रेला. रु. ५०
तमिळ - अतीशय कन्निपि़डीप्पू रु. २५
ગુજરાતી - નાડીગ્રંથ ભવિષ્ય. - રુ.80